आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tawde Complaint Against Maha Govt Latest News In Marathi

राज्यपालनियुक्त आमदार अडचणीत? तावडे यांची गृहमंत्री राजनाथ यांच्याकडे तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यपालनियुक्त आमदारांच्या रिक्त असलेल्या बारा जागांवर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रत्यक्षात साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा तसेच शिक्षण अशा विविध क्षेत्रांतल्या तज्ज्ञांची या जागांवर नियुक्ती होणे अपेक्षित असताना सत्ताधारी आघाडीने मात्र केवळ आपल्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याची तक्रार भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे. या नियुक्त्या संकेत डावलून व राजकीय सोयीसाठी होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तक्रारीची केंद्राने दखल घेऊन राज्यपालांना निर्देश दिले तर या नियुक्त्या अडचणीत येऊ शकतील, असे सूत्रांनी सांगितले.