आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तावडेंची दहावी-बारावीची गुणपत्रिका देण्यास नकार; ‘आरटीआय’ला ठेंगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शैक्षणिक गुणवत्तेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची दहावी तसेच बारावीची गुणपत्रिका माहितीच्या अधिकाराखाली देण्यास बोर्डाने नकार दिला आहे. त्यामुळे तावडेंच्या शैक्षणिक पात्रतेचे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे होत चालले आहे.

तावडे हे इलेक्‍ट्रानिक्स इंजिनिअर असल्याचे त्यांच्या निवडणुकीच्या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, ज्या विद्यापीठातून तावडे हे बीई झाले आहेत ते ज्ञानेश्वर विद्यापीठ ही अधिकृत संस्था नसल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. या प्रकरणातूनच मग तावडे हे बारावीही पास झाले नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्यासाठीच माहितीच्या अधिकारातून तावडेंच्या १०वी ते १२ वीची गुणपत्रिका तसेच हॉलतिकीट, अशी माहिती कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवली होती. यावर बोर्डाच्या जनमाहिती अधिकारी आणि सहसचिव रंजना चासकर यांनी अशी माहिती फक्त ज्याची गुणपत्रिका आहे, त्यास देण्याचा नियम असल्याचे सांगितले.

या आदेशाच्या विरोधात गलगली यांनी प्रथम अपील केले असता दहावी आणि बारावी बोर्डाचे मुंबई मंडळाचे विभागीय सचिव सि. या. चांदेकर यांनी आदेश दिले की विनोद तावडे यांची माहिती त्रयस्थ व्यक्तीची असल्याने देता येत नाही. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ११(१) अंतर्गत माहिती देण्यासाठी संबंिधत व्यक्तीस आधी लेखी नोटीस देण्यात येते. मात्र, यासाठी आपण संबंिधत व्यक्तीचा म्हणजे तावडेंचा दहावी, बारावीचा बैठक क्रमांक, वर्ष आणि पत्ता नमूद करत स्वतंत्र अर्ज दाखल करावा, असे गलगली यांना सांगण्यात आले.
या िनर्णयावर गलगली यांनी आपल्या अपील सुनावणीत युक्तिवाद केला की गुणपत्रिका नाही दिली तरी चालेल, पण कमीत कमी विनोद तावडे उत्तीर्ण आहेत किंवा नाही? याबाबत लेखी माहिती मिळावी. पण विभागीय सचिव चांदेकर यांनी या मागणीसही नकार दिला. त्यामुळे अाता तावडे यांनीच आता याबाबतीत पुढाकार घेत संशयाचे वातावरण दूर करावे, अशी माफक अपेक्षा गलगली यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, एकूणच या प्रकरणावरून विराेधक पुन्हा तावडे यांना लक्ष्य करणार असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत.

मंत्र्याच्या दबावाखाली माहिती देण्यास नकार : नवाब मलिक
तावडेंची १० व १२ वी गुणपत्रिका देण्यास बोर्ड देत असलेला नकार म्हणजे कुठेतरी िशक्षणमंत्र्यांच्या दबावाखाली माहिती दडपली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणात तावडेंनीच आता स्वत: पुढाकार घेऊन ही माहिती जनतेला द्यावी. मात्र, ते माहिती उघड करत नसतील तर नक्कीच यात काहीतरी गौडबंगाल आहे, अशी शंकाही मलिक यांनी उपस्थित केली.

माहिती हवीय, माझ्याकडे या : तावडे
‘माहितीच्या अधिकारात ज्यांना माझी गुणपत्रिका उपलब्ध झाल्या नाहीत, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, मी त्यांना ते हवे असलेले गुणपत्रक उपलब्ध करून देईन’, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार दहावी अथवा बारावीच्या गुणपत्राची प्रत ही फक्त संबंधित उमेदवारालाच मिळू शकते. त्रयस्थ व्यक्तीला गुणपत्रक देण्याची तरतूद मंडळाच्या नियमात नसल्याचे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केल्याकडेही तावडे यांनी लक्ष वेधले.