आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाबाबत भक्कमपणे हायकाेर्टात बाजू मांडणार : तावडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा आरक्षणाबाबत २८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या वेळी राज्य शासनामार्फत अधिक भक्कमपणे बाजू मांडली जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण समन्वय समितीची अध्यक्ष विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बाेलत हाेते. मराठा आरक्षण समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विनायक मेटे, राजेंद्र कोंढरे अादींची उपस्थिती हाेती.

तावडे म्हणाले की, ‘मराठा आरक्षणासंदर्भात आतापर्यंत राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुढील आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता यांनाही बोलविण्यात येईल. राज्यात शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणून मराठा समाजाचा विचार व्हावा, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये मराठा समाजाच्या समुदायाला आरक्षण मिळावे आदी मुद्दे या बैठकीत मांडण्यात येतील. तसेच २८ जूनपासून उच्च न्यायालयात मराठा आरक्षण विषयाबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्य शासनाची आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबतची भूमिका भक्क्मपणे मांडली जाणार आहे. यासाठी माजी अॅडव्होकेट जनरल ॲड. रवी जाधव, ॲड. विजय थोरात हे राज्य शासनाची बाजू मांडणार आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या पाच-सहा महिन्यांत राज्य शासनाने गोळा केलेले पुरावे तसेच अन्य कागदपत्रे विविध विभागांनी गठित केलेली माहिती न्यायालयात मांडण्यात येईल. राज्य शासन मराठा आरक्षणासाठी आग्रही असून मराठा आरक्षण न्यायालयात कायम राहील यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...