आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायोलिनवादक नंदू होनप यांचे मैफलीतच निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निघालो घेऊन दत्ताची पालखी, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, स्वामी कृपा कधी करणार, अशा हजारो गीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार व नामवंत व्हायोलिनवादक नंदू होनप (६४) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात सूरसाधना कार्यक्रमात त्यांची व्हायोलिन वादनाची मैफल सुरू होती. मैफलीचा शेवट करताना त्यांनी त्यांचे सुप्रसिद्ध गाणे दत्ताची पालखी वाजवायला सुरुवात केली. या वेळी 'दिगंबरा, दिगंबरा’चा गजर टिपेला पोहोचला असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते पाठीवर कोसळले आणि तेथेच त्यांचे निधन झाले.
बातम्या आणखी आहेत...