आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Viral Video : More Than 16 Lakh Hits In Three Days

मेरे सामने वाली सरहद पर...दुश्मन रहता है, व्हिडिओ भारत- पाकमध्ये व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - असं म्हणतात की संगीताला कोणत्याही सीमा नसतात. देशादेशांत सीमारेषा आखणाऱ्यांना त्याच संगीताद्वारे समजावून सांगितले तर? असाच काहीसा प्रयत्न इंडियन ओशन या प्रसिद्ध भारतीय बँडचे गायक राहुल राम यांनी केला आहे. त्यांनी ‘मेरे सामने वाली सरहद पर...’चा पोस्ट केलेला व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. १५ ऑगस्टला पोस्ट केलेल्या या गाण्यात भारत व शेजारी देशातील शत्रुत्त्वाच्या भावनेमागे एकसमान धागा असल्याचे सांगितले आहे. या गाण्यात दोन्ही देशांतील नेत्यांनाही चिमटे काढले आहेत.
या गाण्यात ‘तेथे भुत्तो आणि येथे गांधी’ अशा ओळी आहेत. राहुल राम यांनी हे गाणे आपला ९० मिनिटांचा स्टँडअप कॉमेडी शो ‘ऐसी तैसी डेमाेक्रसी’ मध्ये समाविष्ट केले आहे. राहुलला स्टँडअप आर्टिस्ट वरुण ग्रोवर व संजय राजोरा यांनी साथ दिली. पाकमध्ये यू- ट्यूबवर बंदी असल्यामुळे ओशन ग्रुपने हा विडंबनात्मक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हे गाणे तयार केले. भारत-पाक एकमेकांवर संतापतात. मात्र अनेक बाबतीत त्यांच्यात साम्य आहे, हाच विचार घेऊन आम्ही हे गाणे तयार केले आहे, असे विवेक ग्रोवर यांनी दिव्य मराठी नेटवर्कला सांगितले. तीन दिवसांत १६ लाख लोकांनी फेसबुकवर हा व्हिडिओ पाहिला आहे. २० हजार जणांनी तो शेअर केला आहे. यू-ट्यूबवर ७९ हजार व्ह्यू आहेत. हा व्हिडिओ भारतात जेवढा लोकप्रिय होत आहे, तेवढाच तो पाकिस्तानमध्येही लोकप्रिय होत आहे.
हे आहेत गाण्याचे बोल
मेरे सामने वाली सरहद पर...
मेरे सामने वाली सहरद पर, कहते हैं दुश्मन रहता है।
पर गौर से देखा जब उसको, वो तो मेरे जैसा दिखता है।।
वहां मुल्ले यू-ट्यूब बैन करें, यहां पंडित किसिंग से घबराएं।
वहां ब्लैसफेमी का फंदा है, यहां गाय से कोई न टकराए।।
यहां रात और दिन नेता मारे, वहां फौज का बम्बू रहता है।।
यहां और वहां, बम गिराना आसान है, वीजा मिलना मुश्किल है।
डेमोक्रेसी सड़ रही जेलों में, और सरकारों में कातिल हैं।
बस दो फैमिली की चांदी है, वहां भुट्‌टो है, यहां गांधी है।।
हे गाणे ‘पड़ोसन’ चित्रपटाच्या ‘मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है’ च्या चालीवर आहे.