आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 3 कोटींच्या ऑडीचा मालक बनला विराट, जगभरात अशा फक्त 99 कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टीम इंडियाचा कर्णधार धोनीप्रमाणेच स्टार क्रिकेटर विराट कोहलीलाही कार गाड्यांचा शौकिन मानले जाते. या शौकिनपणातून विराट कोहलीने नुकतीच Audi R8 LMX कार खरेदी केली आहे. ही ऑडी कार जगातील सर्वात वेगवान गाडी असल्याचा दावा कंपनीकडून केला जातो. या कारची किंमत 2 कोटी 93 लाख रूपये आहे व ही कार जगातील फक्त 99 लोकांकडेच आहे. जर्मन लक्झरी ब्रॅंड असलेल्या ऑडीने भारतातील केवळ 4 लोकांसाठीच Audi R8 LMX कार बनविली आहे. यातील दोन विकल्या आहेत. त्यातील एक कार विराट कोहलीच्या मालकीची आहे.
कोहली म्हणाला, कारचा मालक असण्याचा मला गर्व-

कोहली म्हणाला, ''मी माझ्या लिमिटेड एडिशन Audi R8 LMX स्पोर्ट्स कारवर खूपच खुश आहे. मी जगभरातील 99 निवडक कार मालकांपैकी एक आहे याचा मला अभिमान वाटतो. मला नेहमीच कार पसंत पडत आल्या आहेत त्यातही ऑडीचा मी पहिल्यापासून प्रशंसक आहे. माझ्याकडे यापूर्वीच ऑडी आर 8 आणि ऑडी क्यू 7 गाड्या आहेत. मी नव्या कारकडून असेच रोमांचक ड्राईव्हची आशा ठेवत आहे. दुसरीकडे, कोहली आपला ग्राहक बनल्याबाबत ऑडी इंडियाचे प्रवक्ता जो किंग यांनी म्हटले आहे की, ''ऑडी नेहमीच यशस्वी तरूणांचा ब्रॅंड राहिला आहे ज्यांनी मोठे यश मिळवले आहे व जे आपल्या यशाचा व कर्तृत्त्वाचा आनंद साजरा करतात. आमच्या म्हणण्याप्रमाणे Audi R8 LMX विराटसाठी परफेक्ट च्वाईस आहे.
हे आहे कारची खासियत-

या कारमध्ये 5.2-litre V10 इंजिन बसविण्यात आले आहे. कारमध्ये 7 स्पीड गियरबॉक्स आहेत. पावर 570 बीएचसपी आणि मॅक्सीमम टॉर्क 540Nm आहे. ही कार 0 ते 100 हा वेग फक्त 3, 4 सेकंदात पकडते. ही गाडी ताशी सर्वात जास्त 320km/h वेगाने पळू शकते. ही कार निळ्या रंगात उपलब्ध आहे ज्यावर क्रिस्टल इफेक्ट आपल्याला दिसून येतात. ही अशी पहिली कार आहे ज्यात लेजर हायबीम लायटिंग सिस्टिम आहे. यामुळे अंधारात जास्त विजिबिलिटी वाढते. ही लाईट ताशी 60 किमीपेक्षा जास्त वेग असल्यास कार्यरत होते. याचा प्रकाश आपल्या सामान्य एलईडी लाईटच्या दुपटीने जास्त मिळतो. या गाडीत एक कॅमेरा बेस्ड सेंसर सिस्टिम आहे. जी रस्त्यावर दूसरी गाडी येत असेल तर ते शोधून हेडलाईटच्या पॅटर्न करून एडजस्ट करते. ज्यामुळे चालकाला त्याचा अंदाज यावा.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, ऑडीसोबतचे विराट कोहलीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...