आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Visa Case: American Plane Delay Due To Air India?

परदेशी व्हिसा प्रकरण: अमेरिकेच्या विमानाला एअर इंडियामुळे विलंब?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौ-यावर जात असताना प्रवासी विमानाला झालेला विलंब मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या विसर भोळेपणामुळे झाल्याचे सांगितले जात असले तरी एअर इंडियाच्या कर्मचा-यांनी कर्तव्यात कसूर केल्यानेच हे प्रकरण घडल्याचे आता पुढे येत आहे. अाता एअर इंडियाचे अधिकारी आपल्या कर्मचा-यांना वाचवण्याची धडपड करीत असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काहीही बोलणार नसून पंतप्रधानांना देण्यात येणा-या अहवालातच सत्य बाहेर येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी सांगितले की, प्रवीण परदेशी व्हिसा नसलेला पासपोर्ट घेऊन विमानतळावर गेले ही त्यांची चूक होतीच, परंतु त्यांच्यामुळे विमानाला उशीर झालेला नाही. जेव्हा बोर्डिंग पास दिला जातो तेव्हा व्हिसा पाहिलाच जातो, परंतु विमानतळावरील कर्मचा-यांनी परदेशी यांचा व्हिसा पाहिला नाही. एवढेच नव्हे तर इमिग्रेशन काउंटरवरही त्यांचा व्हिसा पाहिला गेला नाही.

चेक इन करतानाच व्हिसा तपासला असता तर तेव्हाच परदेशींच्या पासपोर्टवर व्हिसा नसल्याचे उघड झाले असते. जर बोर्डिंग पास देतानाच व्हिसा पाहिला असता तर तेव्हाच परदेशी यांनी लगेच पासपोर्ट मागवून घेतला असता. परंतु आपल्या कर्मचा-यांची चूक झाकण्यासाठी एअर इंडियाच्या काही अधिका-यांनी ‘मुख्यमंत्री सचिव परदेशींशिवाय अमेरिकेला जाणार नाहीत’ अशा बातम्या पसरवल्याचे सांगण्यात येते.

माेदींनी अहवाल मागवला
पंतप्रधानकार्यालयाने या प्रकरणाचा अहवाल मागितला असून या अहवालात प्रत्येक मिनिटाची माहिती देणे बंधनकारक आहे. आपल्या कर्मचा-यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे अहवालात बाहेर येणार असल्याने एअर इंडियाचे अधिकारी चिंतित आहेत. या कर्मचा-यांना कसे वाचवावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडल्याचेही सूत्रांनी सांगितले.