आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणूकदारांना एक दिवसात व्हिसा : कॅमरॉन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ब्रिटनमध्ये जाणारे भारतीय विद्यार्थी व गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणा-या निर्णयाची ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांनी सोमवारी घोषणा केली. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी मर्यादित विद्यार्थ्यांची अट शिथिल करण्यात आली तर गुंतवणूकदारांना एक दिवस व्हिसा मिळणार आहे.

ताज हॉटेलमध्ये दोन्ही देशातील उद्योजकांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी येणा-या व अभ्यासक्रम पूर्ण करून तेथेच नोकरी करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी आता संख्येची मर्यादा शिथिल करण्यात येत आहे.दोन्ही देशाचे संबंध दृढ करण्यासाठी ब्रिटन सरकार व्यापा-यात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील. भारतानेही त्यादृष्टीने पाउले उचलण्याची गरज आहे. ब्रिटनमध्ये भारतीय गुंतवणुकीचे आम्ही स्वागतच करतो. भारतानेही ब्रिटनच्या गुंतवणूकदारांसाठी बॅँकिंग व रिटेलमध्ये प्रक्रिया सोपी करायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रतन टाटांकडून स्तुती
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी भारत व ब्रिटन यांच्यातील सलोख्याच्या संबंधाची स्तुती केली. या संबंधाचा दोन्ही देशांना लाभ होणार असून, आशिया व अफ्रिका खंडात संयुक्तपणे चांगल्या संधीही शोधता येतील.