आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'विश्वरुपम\' बनविला की मी \'इस्लाम विरोधक\' होतो का?- कमल हसन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कमल हसन यांच्या वादग्रस्त विश्वरुपम या चित्रपटाचा वाद निवळण्याची शक्यता असून हसन यांचे बंधू चंद्रा आणि काही मुस्लिम संघटनांच्या नेत्यांत कोणती दृश्ये वगळावीत, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. कमल हसन यांनी चित्रपटातील काही भाग वगळण्याचे गुरुवारी मान्य केले होते. त्यानंतर हा वाद शमण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, महाराष्ट्रात हा चित्रपट आज रिलीज झाला आहे.

कमल हसन सध्या मुंबईत असून, हिंदी भाषेतील 'विश्वरुपम' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याआधी गुरुवारी सायंकाळी कमल हसन यांनी देशातील सामाजिक-राजकीय स्थितीवर सडकून टीका केली. तसेच आपण कोणताही धर्म-जात मानत नसल्याचे सांगत कोणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले.
कमल हसन यांनी या विषयावर आणखी काय भाष्य केले आहे, वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...