आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेखक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या या प्रशासकीय अधिकाऱ्याची निवृती मात्र गतिमान कारभाराने चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/कोल्हापूर- अवघ्या आपल्या लेखनामुळे परिचित असलेले नाव म्हणजे विश्वास पाटील हे होय. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून वावरणाऱ्या विश्वास पाटील यांची प्रशासकीय निवृत्ती मात्र अतिशय वादग्रस्त ठरली. निवृत्तीआधी 5 दिवसांत त्यांनी ‘झोपु’च्या 450 फायली निकालात काढल्या. 28 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात जन्म झाला. चंद्रमुखी, पांगिरा, पानिपत, महानायक, लस्ट फॉर लालबाग, संभाजी या त्याच्या कादंबऱ्या गाजल्या. तर रणांगण हे नाटक व नॉट गॉन विथ द विंड हा त्यांचा लेख संग्रह गाजला.
 
कादंबर्‍यांची हिदी भाषांतरे 
 विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी, पांगिरा आणि महानायक या कादंबर्‍यांची हिदी भाषांतरे झाली आहेत. पानिपतला प्रियदर्शनी पुरस्कार, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार व कलकत्त्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारांसह पस्तीसहून अधिक पुरस्कार लाभले. झाडाझडतीला 1992 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...