आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनावश्यक व्यावसायिक कॉल्समुळे व्होडाफोनला दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य ग्राहक पंचायतने एका प्रकरणात व्होडाफोन इंडियाला सेवेतील त्रुटीबद्दल दोषी ठरवले आहे. एका डॉक्टरने व्होडाफोन कंपनीविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात कंपनीवर 20 हजार रुपये नुकसानभरपाई व खटल्याचा पाच हजार रुपये खर्च देण्यास सांगितले आहे.

व्होडाफोन नियमानुसार सेवा देण्यात अपयशी ठरल्याचे न्या. एस. आर. खांझोदे आणि न्या. धनराज खामतकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. ग्राहक मंचाच्या आदेशाविरुद्ध कंपनीने दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळण्यात आली. डॉ. आशिष गाला मुलुंड उपनगरात व्यवसाय करतात. त्यांनी व्होडाफोन कंपनीच्या ‘डू नॉट कॉल लिस्ट’ सेवेसाठी नोंदणी केली होती. असे असतानादेखील त्यांना विविध कंपन्यांच्या जाहिरातीचे ‘कॉल्स’ येत राहिले. त्यामुळे त्यांनी 30 ऑगस्ट 2008 रोजी व्होडाफोन कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली. दूरसंचार आणि वाणिज्य संचार नियमाचे उल्लंघन केले नसल्याचे कंपनीचे म्हणणे होते. दूरसंचार नियमानुसार व्यावसायिक कॉल्स संपूर्णपणे बंद करण्याची आपल्यावर जबाबदारी नसल्याचा कंपनीचा दावा फेटाळण्यात आला. 31 जुलै 2007, 2 ऑगस्ट 2007 रोजी आलेल्या व्यावसायिक कॉलचा दाखला तक्रारीत देण्यात आला होता. अनावश्यक कॉलचा अटकाव करण्यासाठी व त्याविरोधात कारवाई करण्याबाबतची माहिती कंपनीतर्फे दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, माहिती पुरवण्यासाठीचा 15 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यामुळे ती नष्ट झाली. परिणामी कंपनीकडून संबंधित कॉलची माहिती मिळू शकली नाही, असे ग्राहक मंचाने म्हटले आहे.