आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio ला टक्कर: Vodafone चा न्यू प्लॅन, 346 रुपयांत अनलिमिटेड कॉलसह दररोज 1GB डेटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स ‘जिओ प्राईम’ला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने न्यू प्लॅन लॉन्च केला आहे. 28 दिवसांच्या कालमर्यादेत 346 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 1GB प्रमाणे महिन्याला 28GB 4G डेटा मिळणार आहे. त्याचसोबत अनलिमिटेड फ्री कॉल करता येणार आहेत. प्रीपेड ग्राहकांसाठी हा प्लॅन आहे.

दरम्यान, रिलायन्सच्या ‘जिओ प्राईम’नुसार दर महिन्याला 303 रुपयांचा रिचार्ज केल्यास, अनलिमिटेड कॉल, एसएमएस आणि दररोज 1GB 4G डेटा मिळणार आहे. मात्र, हा प्लॅन प्राईम ग्राहकांसाठीच असणार आहे. जिओच्या प्रीपेड ग्राहकांना आधी 99 रुपयांत प्राईम मेंबरशिप घ्यावी लागेल. व्होडाफोनने मात्र, ग्राहकांना अशी कुठलीही अट घातलेली नाही.
 
रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबरशिप आणि नव्या ऑफर्समुळे इतर कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. एअरटेलपाठोपाठ आता व्होडाफोननेही इंटरनेट डेटा आणि व्हॉईस कॉल्सचा प्लॅन लॉन्च केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, व्होडाफोन नवा प्लॅनविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...