आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ZP साठी खडसे, मुंडे कुटुंबीयांचे मतदान, अनेक गावांनी टाकला बहिष्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा (उस्मानाबाद जिल्हा परिषद)- लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावताना नवरदेव. - Divya Marathi
परंडा (उस्मानाबाद जिल्हा परिषद)- लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावताना नवरदेव.
मुंबई - राज्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्याचे भवितव्य आज मतदान केंद्रात बंद होत आहे. या ठिकाणी कोणाची सत्ता असणार याचा निर्णय २३ फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यात अनेक व्हीआयपी मतदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील मतदान केंद्रात एका नवरदेवाने लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावला.
 
पंकजा मुंडे यांनी खासदार प्रितम मुंडे आणि आणि प्रज्ञा मुंडे यांच्यासह मतदान केले. तर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही सहकुटुंब मतदानाला हजेरी लावली. विविध कारणांनी अनेक गावांनी मतदानावर सार्जनिकरित्या बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले. यात मराठवाड्यातील 15 गावांचा समावेश होता. गडचिरोली येथे नक्षलप्रभावित भाग असल्याने दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान झाले. तर इतर भागांत साडे पाच वाजेपर्यंत मतदान होत आहे. 
 
पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदांसाठी एकूण ८५५ जागांसाठी ४ हजार २८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उर्वरित दहा जिल्हा परिषदांचे व दहा महापालिकांचे मतदान २१ फेब्रुवारी राेजी हाेईल. त्यानंतर दाेन्ही टप्प्यांतील मतमाेजणी व निकाल २३ फेब्रुवारी राेजी जाहीर हाेणार अाहेत.

UPDATES
- औरंगाबादेत 1.30 वाजेपर्यंत 34.19 टक्के मतदान. 
- अहमदनगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी दरम्यान पांगरमल गावातील दु:खद घटनेमुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहीष्कार टाकला. 
जालना : दुपारी 1.30 वाजेपर्यंत 40 % मतदान                        
कुहेपानाचे ( भुसावळ ) येथे भाजप उमेदवार समर्थकांवर हल्ल्याचा प्रयत्न
जि.प. व पं.स. निवडणुकीत बीड जिल्ह्यात दुपारी 1.30 पर्यंत 38.10 टक्के मतदान
- भुसावळ सकाळी 11.30 पर्यंत 17. 05 टक्के मतदान.                        
- मुक्ताईनगर बारापर्यत वीस टक्के मतदान                        
- गडचिरोली दुपारी 12 पर्यंत 41 टक्के, चंद्रपूर 33 टक्के, वर्धा 43 टक्के
- गडचिरोलीत दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार मतदान 
- माजीमंत्री सुरेश धस यांनी सपत्निक जामगाव येथे मतदानाचा हक्क बजावला
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा.डाॅ. प्रितम मुंडे व त्याxच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे यांनी नाथ्रा येथे बजावला मतदानाचा हक्क.
- बुलडाणा : 11 वाजेपरय्ंत 20 टक्के मतदान
- मराठवाड्यातील 15 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती आहे. 
- बीड : काकू नाना विकास आघाडीच्या पोलिंग एजंटला जयदत्त(आण्णा) क्षीरसागर यांची धमकी 
- लातूर : शेंद्री (ता. अहमदपूर) येथे गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार..
- उस्मानाबाद जिल्ह्यातील खोंदला गावक-यांची एकजूट, सकाळी 11 पर्यंत एकही मतदान नाही 
- परळीच्या हिवरा (गो) येथील मतदान यंत्र तांत्रिक कारणांमुळे बंद                        
- वैजापूर : सकाळी ७.३०ते ९.३० पर्यंत ५.८६ टक्के मतदान.                        
- वैजापूर : बेंदवाडी परसोडा येथील मतदाराची नावे दोन गटात विभागल्यामुळे गोंधळ              
- गेवराई तालुक्यातील तलवडा हद्दीतील पांढरी गावातील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार.
 
बोहल्यावर चढण्यापूर्वी  नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क... ​
- चाळीसगाव तालुक्यात देवळी-तळेगांव जिल्हा परिषद गटातील अंधारी येथील एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदान केंद्रबाहेर हाणामारी
- यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात कळसा येथे मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. 
- भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला  बेदम मारहाण केली आहे. 

पांगरमल गावकर्‍यांचा मतदानावर बहिष्कार
- पांगरमल येथे उमेदवाराने दिलेल्या पार्टीत अतिमद्य सेवन केल्याचे पाच जणांचा मृत्यू झाला होता. 
- या घटनेच्या पार्श्वभूमीवर पांगरमल ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 
- लातुरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या कॉलेजमध्ये सापडल्या दारुच्या बाटल्या
- मतदारांना आमिष दाखवण्यासाठी दारु आणल्याचा आरोप, उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल 
- लातूरमधील औसा तालुक्यात काँग्रेसतर्फे वेताळेश्वर भीमाशंकर बावगे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. 
- बावगे यांनी राजीव गांधी पॉलिटेक्निकमध्ये दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. पोलिसांनी दारुच्या बाटल्यांचे 12 बॉक्स जप्त केले आहेत. 
   
दरम्यान, १५ जिल्हा परिषदांतर्गतच्या १६५ पंचायत समित्यांच्या १ हजार ७१२ जागांसाठी ७ हजार ७००  उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर एकूण २ कोटी ४ लाख ४ हजार ३०० मतदार असून त्यापैकी १ कोटी ७ लाख ७९ हजार ७२६ पुरुष, ९६ लाख २४ हजार ४७९ महिला; तर ९५ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी २४ हजार ३१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्याने ७२ हजार ९३ बॅलेट युनिट आणि ४८ हजार ६२ कंट्रोल युनिट उपलब्ध करून दिले आहेत. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी एक लाख ५८ हजार ६०४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकारांना दिली. 

या जिल्ह्यात मतदान
बीड, जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अाठ पंचायत समित्या व त्याअंतर्गतचे निवडणूक विभाग.  
 
मतदानाची वेळ : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंतच.  
 
एक दृष्टिक्षेप  
> जिल्हा परिषदा : १५ जागा : ८५५
> जिल्हा परिषदांसाठी उमेदवार : ४,२८९  
> पंचायत समित्या : १६५ जागा : १,७१२
> पंचायत समित्यांसाठी उमेदवार : ७,७०० 
> एकूण मतदार २,०४,०४,३००
> एकूण मतदान केंद्रे : २४,०३१  
> मतदान यंत्रे : ४८,०६२  
> कर्मचारी : १,५८,६०४
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...