मुंबई - मुंबई पोलिस सध्या एका नटवरलाल सौंदर्यवतीचा शोध घेत असून, तिच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. केवळ बारावीपर्यंत शिकलेल्या या तरुणीने तीन वर्षांत 16 कोटी रुपयांचे घबाड कमावले. एवढेच नाही तर तिच्या मालकीचे सहा बंगले आणि चार महागड्या कार आहेत.
आपल्या सौंदर्याची मोहिनी घालून तिने एका कंपनीला गंडा घातला. पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले.
कोण आहे ती महिला नटवरलाल...
> या महिलेचे नाव वृषाली सचिन बामने आहे. तिने तीन वर्षांत मुंबईतील फोर्टच्या महालक्ष्मी रोड वर्क्समधून 16 कोटी रुपयांची रोकड लंपास केली.
> या ठिकाणी ती मागील सात वर्षांपासून अकाउंटेंट म्हणून काम करत होती.
> तिने आपल्या सौंदर्याची मोहिनी घालून आपले सहकारी आणि मालकाचा विश्वास संपादित केला.
पोलिस झाले आवाक्...
> पोलिस जेव्हा वृषालीचा शोध घेण्यास गेले तेव्हा तिची संपत्ती पाहून आवाक् झाले.
> वृषालीच्या नावावर 6 बंगले, 4 लग्झरी कारसह इतर छोट्या मोठ्या गाड्या असल्याचे तपासात आढळले.
> तिने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक करून ही माया जमवल्याचे सांगितले जात आहे.
> पोलिसांनी तिच्या विरुद्ध 408 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पगार केवळ 18 हजार रुपये...
> ती सात वर्षांपासून या कंपनीमध्ये काम करत होती.
> कंपनीकडून तिला 18 हजार रुपये पगार दिला जात होता.
> मागील तीन वर्षांत तिने वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 16 कोटी रुपये ट्रांसफर केले.
पुढील स्लाइड्वर वाचा, वृषाली बामनेची संपत्ती... कंपनीला कसा घातला गंडा....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)