आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याघ्रदूत होणे हा सन्मानच; व्याघ्रवैभव जगभर पोहोचवू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘महाराष्ट्राचा व्याघ्रदूत म्हणून राज्य सरकारने मला दिलेली संधी हा माझ्यासाठी सन्मान आहे. या माध्यमातून व्याघ्र संवर्धन व संरक्षणाच्या क्षेत्रात मी माझे सक्रिय योगदान देऊ शकेन. सोशल मीडियावर माझे ४२ दशलक्ष चाहते आहेत. त्यांच्यापर्यंत व्याघ्रदूत म्हणून माझी भूमिका समर्थपणे पोहोचेल याचा मला विश्वास आहे. या पुढील काळात महाराष्ट्राचे व्याघ्रवैभव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी मी प्रयत्नांची शर्थ करेन,’ अशी ग्वाही बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी दिली.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बच्चन यांच्या जुहू परिसरातील कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे व्याघ्रदूत होण्यास बिग बींनी होकार दर्शवल्याबद्दल वनमंत्र्यांनी त्यांचे अाभार मानले. व्याघ्रदूत म्हणून काम करण्यासाठी परिपूर्ण योजना व आराखडा वन विभागाने तयार करावा, त्या माध्यमातून हे काम गतीने पुढे नेऊ, असा विश्वास बच्चन यांनी व्यक्त केला. त्यावर मुनगंटीवार यांनी राज्यातील ६ व्याघ्र प्रकल्प, वन वैभव तसेच वन विभागाचे विविध उपक्रम व योजनांबाबत बच्चन यांना माहिती दिली. तसेच वाघाची भव्य प्रतिकृती व वन विभागातर्फे प्रकाशित विविध पुस्तके भेट दिली.