आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटात सध्याच काम करणार नाही, ज्‍येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची स्पष्टोक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मी सुमारे सात भाषांतील चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी एका दिग्दर्शकाने मला मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची विनंती केली होती.  मात्र, तरी  मराठी चित्रपटांत काम करण्याचे ठरवले नाही, असे ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी नुकतेच सांगितले.
दिग्दर्शका सारिका मेने यांचा "आरती'  हा चित्रपट लवकरच प्रदर्शित  होणार असून या चित्रपटाच्या प्रमोनसाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रपटासाठी वहिदा यांनी सारिका हिला मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
 
वहिदा म्हणाल्या, गाईडमध्ये साकारलेली "रोझी' ही बंडखोर होती. गेल्या काही वर्षांत प्रदर्शित स्त्रीवादी चित्रपट  मुख्यत: स्त्री दिग्दर्शकांनीच दिग्दर्शित केले आहेत. त्याबद्दल काय वाटते? सध्याच्या हिंदी चित्रपटांत दाखविली जाणारी बंडखोर स्त्री ही तुम्ही साकारलेल्या रोझीची पुढची आवृत्ती आहे असे वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना वहिदा म्हणाल्या की, गाईड चित्रपट १९६५ मध्ये आला. एवढ्या वर्षांपूर्वी बनविलेल्या गाईडची कथा त्या काळाच्या मानाने खूपच प्रागतिक व पुरोगामी होती. गाईडमधील नायिका रोझी आपल्या पतीला सोडते. साऱ्या बंधनातून मुक्त होते. राजू गाईडबरोबर राहायला लागते. रोझीमध्ये होत असलेले हे परिवर्तन बघताना ते कुठेही सवंग वाटत नाही. याचे श्रेय सर्वस्वी दिग्दर्शकाला द्यायला हवे. "आज फिर जिने की तमन्ना है' हे गीत  प्रचंड  गाजले होते. आजही हे गाणे अनेकांना आवडते. रोझी ज्यावेळी पडद्यावर आली तेव्हा समाजात इतकी मोकळीक नव्हती. आजच्या चित्रपटांमधील नायिका खूपच बोल्ड आहे. ती काळानूसार जाणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

आरतीला उपचारासाठी मदत
दिग्दर्शिका सारिका मेने हिचा सख्खा भाऊ सनी पवार व सनीची मैत्रिण आरती यांची वास्तव कथा “आरती’ चित्रपटात गुंफण्यात आली आहे. २००६ सालची गोष्ट अाहे. “आरती’ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे सहलीला गेली होती. ती ज्या गाडीतून प्रवास करत होती त्या गाडीला अपघात झाला. त्यात पुढच्या सीटवर बसलेल्या आरतीच्या मेंदूला मार लागला. ती बेशुद्ध झाली. त्यानंतर काही वेळ पुन्हा शुद्धीत आली. स्थानिक रुग्णालयात आरतीवर उपचार सुुरू असताना ती कोमात गेली. तिला जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे ती सहा महिने कोमात होती. त्यावेळी सनी पवार हा रात्रंदिवस तिच्यासोबत होता. याबाबत वहिदा यांना माहिती  मिळाल्यानंतर त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता आरतीच्या उपचारासाठी अर्थिक मदत केली. 
बातम्या आणखी आहेत...