आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्फ बोर्डाच्या जमिनीची माहिती संकेतस्थळावर : खान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अतिक्रमण रोखण्यासाठी यापुढे वक्फ बोर्डाच्या जमिनीची माहिती जनतेसाठी संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी विधान परिषदेत दिली.

शिवसेनेच्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना खान यांनी अतिक्रमण झाल्याचे मान्य केले. मराठवाड्यातील बोर्डाच्या 82 जागांवर शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. औरंगाबादमघ्ये 18, जालना आठ, परभणीत पाच, नांदेडमध्ये 14, उस्मानाबादमध्ये सात व लातूरमध्ये अशा 30 जागा आहेत. या जागा रिकाम्या कराव्यात अशी नोटिसा पाठवण्यात आल्या असून आतापर्यंत 512 एकर जागा अतिक्रमणमुक्त केली असल्याचेही त्यांनी सांगितले.