आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुख खानला मोठा दिलासा, वानखेडे स्टेडियमवरील \'धक्काबुक्की\'त मिळाली क्लीनचीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान याला वानखेडे स्टेडियमवरील धक्काबुक्कीप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांकडून त्याला क्लीनचिट देण्यात आली आहे. शाहरुख खान यावेळी नशेत नव्हता. तसेच त्याने सुरक्षारक्षकांना शिवीगाळही केली नसल्याचे पोलिसांनी अहवालात म्हटले आहे.

2012 मध्ये आयपीएलच्या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर शाहरुख याच्यावर सुरक्षारक्षक आणि पदाधिका-यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. पण, शाहरुखने सुरक्षारक्षण तसेच पदाधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी महानगर न्यायदंडाधिकाऱ्यासमोर सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्यादरम्यान शाहरूख रंगला होता धक्काबुक्कींंत...?

बातम्या आणखी आहेत...