आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • War Between Jaya Bachchan And Sharukh Khan On Happy New Year Film

हॅपी न्यू इयर : जया बच्चन, शाहरुख खानमध्ये वाक् युद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत अलीकडेच झालेल्या टाटा लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये जया बच्चन यांनी ‘हॅपी न्यू इयर’ हा अत्यंत सुमार दर्जाचा तथ्यहीन सिनेमा होता, असे विधान केले होते. जयाच्या या वक्तव्यावर शाहरुख चांगलाच संतापला आहे. दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी शाहरुखची मेसेजद्वारे माफी मागूनही किंग खानचा जयावरील राग तसूभरही कमी झाला नाही. या वादाला फोडणी म्हणून त्याने थेट अमिताभ यांच्यावर हल्ला चढवत ‘अमर अकबर अँथोनी’ हा चित्रपट तथ्यहीन असल्याचे एका मुलाखतीत सांगितले आहे. त्यामुळे आता बॉलीवूडमधील दोन दिग्गज कुटुंबातील वाद रंगण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हॅपी न्यू इअर या चित्रपटात अभिषेक बच्चनचीही भूमिका आहे.

फराह खानचे दिग्दर्शन असलेल्या 'हॅपी न्यू इअर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 'किक' या चित्रपटालाही मागे टाकले आहे. मात्र, या चित्रपटात काही तथ्य नसल्याचे तसेच अभिषेकची भूमिकाही या चित्रपटात वाईट असल्याचे जया यांनी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये म्हटले होते. त्यानंतर शाहरुख खानशी असलेले मैत्रीचे संबंध तणावपूर्ण होऊ नयेत म्हणून अभिषेक-ऐश्वर्या यांनी शाहरुखची माफी मागितली होती. गुरुवारी अमिताभ यांनी कोलकात्यात "पीकू' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना शाहरुखला मेसेज पाठवून माफी मागितली. मात्र, अमिताभ अभिषेक आणि ऐश्वर्याने माफी मागूनही शाहरुखचा राग कमी झालेला नाही.

सोनिया गांधी, अमरसिंह यांच्याशी वाद
बच्चन कुटुंबाला वाद तसे नवीन नाहीत. काही वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वक्तव्यावरून अमिताभ यांनी "वो राजा है हम रंक है' असे विधान केले. त्या वेळी बराच वाद झाला होता. बच्चन ज्या वेळी कर्जबाजारी झाले होते. त्या वेळी तत्कालीन सपा नेते अमर सिंह यांनी त्यांना मदतीचा हात दिला होता. काही वर्षांतच त्यांची मैत्री संपुष्टात आली. सध्या या दोघांत विस्तवही जात नाही.