आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wardboy Harresment By Women Doctor At KEM Hospital, Mumbai

मुंबईतील केईएम रूग्णालयात वॉर्डबॉयकडून महिला डॉक्टरवर अत्याचार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ड्युटीवर असलेल्या एका महिला डॉक्टरवर हॉस्पिटलमधीलच वॉर्डबॉय पोपट भोवरे याने लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईतील केईएम रूग्णालयात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. 35 वर्षीय वॉर्डबॉय भोवरे याला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, बुधवारी रात्री 32 वर्षीय संबंधित महिला डॉक्टर नेहमीप्रमाणे आपल्या नाईट शिफ्टवर कामावर आली होती. रात्री दीडच्या सुमारास संबंधित महिला ग्राऊंड फ्लोवरला लिफ्टने जाण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी त्या लिफ्टमधून पेशंटचे दोन नातेवाईक व वॉर्डबॉय आले. हे चौघे लिफ्टमधून निघाले. पेशंटचे नातेवाईक पहिल्या मजल्यावरच उतरले. त्यामुळे लिफ्टमध्ये डॉक्टर महिला आणि वॉर्डबॉय दोघेच होते. त्याचवेळी पोपट भोवरे याने महिला डॉक्टरला आपल्या जवळ ओढले व तोंड दाबून विनयभंग केला.
महिला डॉक्टराने लिफ्टबाहेर येताच ही घटना उपस्थितांना सांगितली. त्यानंतर वॉर्डमधील पेशंटच्या नातेवाईकांनी वॉर्डबॉय पकडले व थोडा चोप दिला. त्यानंतर महिला डॉक्टरने पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी पोपटला मध्यरात्रीच ताब्यात घेऊन अटक केली. चार दशकापूर्वी याच केईएम रूग्णालयात नर्स अरुणा शानबाग यांच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आला होता.