आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना@50: बाळासाहेबांचे हे फोटो बघितल्यावर आजही डोळ्यांत तराळते पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला वाघाचे काळीज आणि गरुडाचे पंख दिले. मराठी माणसाला आत्मविश्वासाने जगण्याचे बळ दिले. मराठी स्वाभिमान जागवला. त्यासाठी प्राणपणाने झटण्याची उर्मी भरली. अन्यायाला वाचा फोडून त्यावर मात करण्याचे मनगटाला बळ दिले.

मराठी आवाजाला तडफेची धार दिली. मराठी माना आणखी उंचावल्या. त्यांनी महाराष्ट्राला एवढे भरभरुन दिले, की कधीही ते परत करता येणार नाही. कोणलाही ते मिटवता येणार नाही. त्यामुळेच शिवसेना प्रमुखांची जयंती असो किंवा पुण्यतिथी हे फोटो बघितल्यावर डोळ्यांत पाणी येणार नाही, असा एकही मराठी माणूस सापडणार नाही.

शिवसेनेच्या स्थापनेला येत्या रविवारी (19 जून) 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण हा उद्देश समोर ठेवून आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी बाळासाहेबांची काही निवडक फोटो घेऊन आलो आहोत. हे फोटो बघितल्यावर तुमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याशिवाय राहाणार नाही...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, बाळासाहेब ठाकरे यांचे काही निवडक फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...