आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Clogging Due To Heavy Rain Paralyzes Life In Pune And Suburbs..

मुंबई-पुण्यात अवकाळीचा कहर, 48 तासात गारपीटीसह मुसळधार पावसाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे/नाशिक- राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे-पिंपरी-चिंचवड शहरासह कोकण व सह्यादीच्या रांगेत पावसाने जोरदार हजेरी लावली. अग्नेय आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र झाल्याने ऐन हिवाळ्यात पाऊस कोसळत आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील काही भागांना झोडपून काढले आहे. आता हाच कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र व गुजरातकडे सरकल्याने राज्यात अवकाळीचा जोर वाढला आहे. येत्या 48 तासात राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच काही भागात गारपीट होण्याचा अंदाजही वेधशाळेने व्यक्त केला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतक-यांना फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्यता अधिक आहे. कांदा, द्राक्ष, काजू पिकांना फटका बसणार आहे.
रविवारी मुंबई, ठाणे पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम उपनगरे, नवी मुंबई, ठाणे-डोंबिवली, बदलापूर-अंबरनाथ परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. पुण्यातही रविवारी दुपारी व रात्रभर पावसाने झोडपून काढले. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत रविवारी रात्री दमदार पाऊस झाला. टेमघर धरण परिसरात 84 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला येथे 60 मिलीमिटर पाऊस झाला. पानशेत येथे 35 तर, वरसगाव येथे 34 मिलीमिटर पाऊस पडला.पुणे शहरात सुमारे 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काही भागात पावसाचा एवढा जोर होता की चारचाकी गाड्याही वाहून गेल्या. नाशकात रविवारी दोन तास मुसळधार पाऊस पडला.
राज्याच्या उर्वरित भागातही पावसाने हजेरी लावली आहे. अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. मराठवाड्यातही येत्या 48 तासात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतक-यांनी सर्तकता बाळगण्याचे आवाहन सरकार व प्रशासनाने केले आहे.