आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापास अधिका-यांना सेवेत घेण्यासाठी मंत्र्याची गळ, ढोबळे शिफारस पत्रामुळे चकित

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणा-या कनिष्ठ भूवैज्ञानिकांनी सेवेत रुजू झाल्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांना सेवेत कायम करता येत नाही. ही परीक्षा तीन प्रयत्नांत अनुत्तीर्ण झाल्यास सेवेतून काढून टाकण्यात येते. मात्र, अशा काढून टाकलेल्या अधिका-यांना पुन्हा सेवेत घ्यावे, अशी गळ एका ज्येष्ठ मंत्र्याने पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.
तर हे अधिकारी सरकारी नोकरीशिवाय अन्यत्र काम करण्याच्या पात्रतेचे नसल्याचा मार्मिक शेरा मारत त्यांना आणखी एक संधी देण्याचा विचार करावा, असे पाणीपुरवठा मंत्र्यांनी लिहिल्याचे सूत्रांनी सांगितले. पाणीपुरवठा खात्याच्या अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा हा विभाग कार्यरत आहे. या विभागाने 2005 आणि त्यापूर्वी झालेल्या कनिष्ठ भूवैज्ञानिकांच्या भरतीसाठी विभागीय परीक्षा वेळोवेळी घेतल्या. ही विभागीय परीक्षा तीन प्रयत्नांत उत्तीर्ण होणे गरजेचे असते. 45 कनिष्ठ भूवैज्ञानिकांसाठी ही परीक्षा 2006,2008 आणि 2010 मध्ये घेण्यात आली. मात्र, या तीनही प्रयत्नांत उत्तीर्ण होऊ शकले नाही, परिणामी या त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. चौथ्यांदा परीक्षा घेण्याची त्यांची मागणीही सामान्य प्रशासन विभागाने फेटाळून लावली. पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या कामात व्यस्त असल्याने ही परीक्षा उत्तीर्ण होता आले नसल्याचे कारण देत या अधिका-यांनी वरिष्ठ मंत्र्याकडे धाव घेतली.