आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात वाॅटर ग्रीड; ३ हजार कोटींची योजना! पाणीबाणीवर उतारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठवाड्यात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर होत चालले असून यावर उपाय म्हणून गुजरातच्या धर्तीवर ग्रीड योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय पेयजल योजना, ग्रामीण पाणीपुरवठा अशा आधीच्या सर्व योजना एकत्र आणून सुमारे ३ हजार कोटींची ही योजना पुढील ३ वर्षांत लागू केली जाणार आहे.

गुजरातच्या कच्छमधील पाणीटंचाईचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रीड योजना आणली होती. छोट्या-मोठ्या सर्व योजना एकत्र करून बनवण्यात आलेल्या या योजनेने कच्छमधील पाण्याची आणीबाणी संपुष्टात आणली. ही योजना नेमकी काय आहे, हे समजून घेण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंंटीवार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर हे नुकतेच कच्छच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी या योजनेची पाहणी केली. त्यांनी मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचे सादरीकरण केले. त्यानंतर याबाबत चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी याविषयीचा अहवाल १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले. तांत्रिक सल्लागार, मुख्य अभियंते, वरिष्ठ अधिकारी असे सर्व मिळून या अहवालावर काम करणार आहेत.
ग्रीड योजना लागू करण्यापूर्वी कच्छला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागत होता. ग्रीड योजनेमुळे ती गरज संपुष्टात आली आहे. लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासाठी एका फेरीला तब्बल १२ लाख रूपये खर्च येत आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये या घटकेला ५०० ते १००० फूट खोलीपर्यंत पाणी मिळत नसल्याने भकास अवस्था झाली असून सध्या ३५०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याचबरोबर राज्य व केंद्र सरकारच्या योजना कार्यरत ठेवण्यासाठी वीजेचा खर्च, मेंटनन्स, साहित्य याचा खर्च होतो तो वेगळाच. प्रत्येक योजनेला वेगवेगळा पैसा लागत असल्याने खर्च जास्त आणि पाणी कमी अशी अवस्था झाली असल्याने ग्रीड योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.
आधीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे जुने, पण भक्कम बांधकाम ग्रीड योजनेसाठी वापरले जाणार असून कालबाह्य बांधकामांचा मात्र उपयोग केला जाणार नाही. कारण यावर वर्षोनुवर्षे बराच पैसा खर्च होत असल्याचे लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आला.
पुढे वाचा...
> पाच ठिकाणांहून पाणी उचलणार!
>तिजोरी रिकामी; पैसा येणार कुठून?
बातम्या आणखी आहेत...