आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यावर टंचाईचे भीषण संकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - झपाट्याने खालावत चाललेली पाणीपातळी पाहता राज्यासमोर टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळेच विविध धरणात आणि जलाशयात शिल्लक असलेला जलसाठा फक्त पिण्यासाठीच राखून ठेवण्यात आला असून, काही शहरांत पाणीकपातही केली जात आहे.

सध्या राज्यातील लहान, मध्यम आणि मोठे प्रकल्प व इतर धरणांत एकूण 7 हजार 30 दशलक्ष घनमीटर जलसाठा असून तो एकूण पाणीसाठय़ाच्या फक्त 19 टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी एकूण पाणीसाठा हा 8,771 दशलक्ष घनमीटर म्हणजे 24 टक्के होता. सध्या सर्वाधिक म्हणजे 1496 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा नागपूर विभागात तर सर्वात कमी म्हणजे 459 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा कोकणात आहे. मराठवाड्यात मात्र गेल्या वर्षीपेक्षा चांगली स्थिती आहे. गेल्या वर्षी जून अखेरीस मराठवाड्यात 465 दशलक्ष घनमीटर जलसाठा होता, तर यंदा मात्र तो 1273 दशलक्ष घनमीटर इतका आहे.