आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या मागणीसाठी ‘वर्षा’वर मोर्चा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात भीषण पाणीटंचाईची समस्या भेडसावत असतानाच हेतावदे धरणातून पाणी मिळावे, या मागणीसाठी पेणमधील नागरिक मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर मोर्चा नेणार आहेत. संघर्ष समितीच्या बॅनरखाली शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील व आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पेणमधून शनिवारी मोर्चाला सुरुवात झाली असून पनवेलमध्ये तो रविवारी पोहोचेल. मुंबईत सोमवारी सकाळी मोर्चा धडकणार आहे. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. हेतावदे धरणामध्ये शेती व पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी आहे. मात्र, सरकार धरणातून पाणी सोडण्यास तयार नाही, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. '