आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांच्या बंगल्यात होतेय पाणी नासाडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याच्या काही भागात दुष्काळाची भयंकर स्थिती असून पिण्याच्या पाण्यासाठी जनता वणवण फिरत आहे. मात्र, त्याच वेळेस मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यात मात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे भाजपचे आशिष शेलार यांनी विधान परिषदेत सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.


किरण पावसकर, भाई जगताप, हेमंत टकले या सत्ताधारी सदस्यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेच्या कारभारासह ठाणे व कल्याण डोंबिवली महापालिकांच्या कारभाराची चिंता व्यक्त करणारा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर बोलताना शेलार यांनी राज्यात दुष्काळ असताना मंत्री कसे पाण्याची नासाडी करीत आहेत हे सप्रमाण दाखवले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात 77 लाख 32 हजार लिटर्स, अजित पवार (देवगिरी- 43 लाख 89 हजार लिटर्स), नारायण राणे (ज्ञानेश्वरी-6 लाख 94 हजार लिटर्स), गृहमंत्री आर.आर. पाटील (चित्रकूट- 79 लाख 14 हजार लिटर्स), छगन भुजबळ (रामटेक- 1 कोटी 36 लाख 96 हजार लिटर्स), मनोहर नाईक (पुरातन- 54 लाख 15 हजार लिटर्स), शिवाजीराव मोघे (मुक्तागिरी- 1 कोटी 27 लाख 50 हजार लिटर्स), पतंगराव कदम (अग्रदूत- 18 लाख 23 हजार लिटर्स), अनिल देशमुख (सातपुडा- 42 लाख 66 हजार 32 हजार लिटर्स), बाळासाहेब थोरात (सेवा सदन- 71 लाख 44 हजार लिटर्स), जयंत पाटील (रॉयल स्टोन- 39 लाख 12 हजार लिटर्स) असे पाणी एका वर्षात वापरले गेले आहे.

सगळ्यात जास्त पाणी छगन भुजबळ आणि शिवाजीराव मोघे यांच्या बंगल्यात वापरण्यात आले आहे, तर सगळ्यात कमी पाणी शिवनेरी व तोरणा या रिकाम्या बंगल्यात अनुक्रमे 32.28 लाख व 13.56 लाख लिटर्स पाणी वापरण्यात आल्याचे शेलार म्हणाले.

बंद बंगल्यातही वारेमाप उधळपट्टी
नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांचा बंगला रिकामा असला तरी तेथे असणारे लॉन व कर्मचारी पाणी वापरतात. तसेच बंगल्यांमध्येही मंत्री जास्त पाणी वापरत नाहीत तर लॉन व येणारे पाहुणे यांच्यासाठी वापरण्यात येते, असे शेलार म्हणाले.