आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वॉटरलेस टॉयलेट : स्वप्न नव्हे, वरदान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘वॉटरलेस टॉयलेट’ ही एरवी स्वप्नवत भासणारी, मुख्य म्हणजे दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरणारी गाेष्ट सत्यात उतरवली आहे ती मुंबई आयआयटीमधील प्राध्यापक किशोर मुन्शी यांनी. सलग तीन वर्षे या विषयावर संशोधन केल्यानंतर प्राध्यापक मुन्शी यांना हे शौचालय तयार करण्यात यश मिळाले आहे.

उघड्यावर शौचामुळे पसरणाऱ्या रोगराईमुळे देशात दरवर्षी हजारावर बालके मृत्युमुखी पडत असताना हा प्रयोग केवळ पाणी वाचवणाराच नव्हे तर जीव वाचवणारा ठरणारा आहे. दोन वर्षांपासून आयआयटीमधल्या लेबर काॅलनीमध्ये हा प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू अाहे.
अाजकाल शाैचालयात फ्लशच्या वापरामुळे पाण्याची नासाडी हाेते. या अिभनव शाैचालयात मात्र जेमतेम एक लाेटाभरच पाण्याची गरज भासते. शिवाय मलमूत्रापासून तयार खताचा शेतीसाठीदेखील उपयाेग हाेऊ शकताे. पाणंदमुक्त भारत या केंद्र सरकारच्या उपक्रमासाठी हे वाॅटरलेस टाॅयलेट केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरातही वापरण्यासाठी एक राेल माॅडेल ठरू शकते. या प्रकल्पासाठी एकूण अंदाजे ८० लाख रुपये खर्च अाला. त्यातील २५ लाख रुपयांचा िनधी सरकारकडून उपलब्ध झाला. उर्वरित खर्चाचा भार अायअायटीने उचलला. बहुतांश िठकाणी फ्लश सुविधा असलेले सिरॅमिक टाइल्सचे टाॅयलेट बांधले जातात. पण पुरेशा पाण्याअभावी मलमूत्र सुकते. त्यामुळे त्यातील बहुतांश शाैचालये बंद पडलेली असतात. पाणी जरी उपलब्ध असले तरी मलमूत्र विसर्जनाचे पाणी बाहेर साेडले जाते. याेग्य मलनिस्सारण सुविधा नसेल तर दुर्गंधी पसरून विविध प्रकारचे अाजार उद्भवतात. वाॅटरलेस टाॅयलेटमध्ये स्टीलचा वापर असल्यामुळे देखभाल खर्चही माेठ्या प्रमाणावर वाचते.
अनेकदा प्रकल्प िबघडले, पण अखेर यश : मुन्शी यांनी विनंती केल्यानंतर केंद्र सरकारकडून या शाैचालयाच्या िनर्मितीसाठी िनधी उपलब्ध झाला. शाैचालय िनर्मिती म्हणजे तुच्छपणाचे काम या भावनेतून अनेकांनी या प्रकल्पावर काम जगभरातील शाैचालयांचा अभ्यास प्रकल्पावर प्रत्यक्ष काम करण्याच्या अाधी मुन्शी यांनी जगभरातील विविध शहरांत शाैचालयांचा अभ्यास केला. भारतात याेग्य प्रकारच्या शाैचालयाची िनर्मिती कशी करता येईल याचा अाराखडा तयार केला.

सुरुवातीला अनेक प्रयाेग फसले. पण मुन्शी यांना नंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्राध्यापकांची याकामी साथ िमळाली. अनेकांनी कमी माेबदल्यात िदवसाचे बारा-बारा तास काम करून हा प्रकल्प यशस्वी केला.

असे काम करते वाॅटरलेस टाॅयलेट : { शाैचालयातील शाैच, मूत्र, पाणी हे ितन्ही घटक वेगळे हाेतात {मूत्र एका पाइपद्वारे टाकीत साठवले जाते. या प्रक्रियेमध्ये मूत्राचा हवेशी संबंध येऊ िदला जात नाही. परिणामी मूत्राला काेणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही. हे मूत्र बाटलीत भरून शेतात खत म्हणून वापरता येते. {शाैच टाकीत पडल्यानंतर त्यातील पाण्याचा अंश वाळू शाेषून घेते. परिणामी पाण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटते. हवा खेळती ठेवल्याने दुर्गंधी पसरत नाही अािण शाैचाचे खतामध्ये विघटन हाेते.

मुलांचे मृत्यू टाळण्यासाठी...: देशातील ९० टक्के पाण्याची साधने प्रदूषित अाहेत. उघड्यावर शाैच केल्यामुळे पाेटाच्या विकाराने लहान मुलांचे मृत्यू हाेण्याचे प्रमाण अिधक अाहे. दुर्गंधीमुळे राेगराई वाढते. अजूनही अनेक भागांत खुल्या जागेवर शाैचविधी केला जाताे. या गाेष्टींना प्रतिबंध व्हावा यादृष्टीने वाॅटरलेस टाॅयलेट प्रकल्प राबवण्याची कल्पना मनात अाल्याचे प्राध्यापक िकशाेर मुन्शी यांनी सांिगतले.

हे हाेतील फायदे
> पाण्याची बचत
> फ्लशसाठी लागणारे पाणी : प्रत्येकी ७ िलटर
> वाॅटरलेस टाॅयलेटमध्ये एक लाेट्यापुरते लागणारे पाणी : १ िलटर
> सुलभ शाैचालयातील शाैचकुपासाठी येणारा खर्च : अंदाजे ३ लाख रु.
> वाॅटरलेस टाॅयलेटसाठी येणारा खर्च : ५० हजार रु.

युिनसेफचा अहवाल काय सांगताे?
> भारतात सुमारे ६ काेटी ६५ लाख व्यक्ती अाजही उघड्यावर शाैचविधी करतात.
> मलनिस्सारणाच्या अपुऱ्या सुविधांमुळे हगवण, काविळीसारख्या पाेटाच्या विकारांमुळे दरवर्षी पाच वर्षांच्या अातील एक हजार मुलांचा मृत्यू हाेताे.
> ग्रामीण भागातील मुली अपुऱ्या सुविधांमुळे शाळांमधून िशक्षण साेडतात. त्यामुळे त्यांचा सामाजिक स्तर घटताे.
> विकसनशील देशांमधील नागरिक पूर्ण िदवसभर जेवढे पाणी वापरतात तितके विकसित देशांमधील ३ काेटी लाेक एका वेळच्या शाैचासाठी पाणी वापरतात.