आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांनी पवार पंतप्रधान हाेऊ शकतात; सेनेने पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादी सत्तेत जाणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘बदलत्या राजकीय वातावरणामुळे २०१९ मध्ये शरद पवार पंतप्रधान होतील’, असा आशावाद माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी साेमवारी व्यक्त केला. 

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनदिवसीय चिंतन शिबिरात प्रफुल्ल पटेल म्हणाले, शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी होणार नाही.भाजप आणि राष्ट्रवादीमधील छुप्या समझोत्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावरही त्यांनी खुलासा केला. ‘सध्याच्या सत्ताधारी पक्षांमधले बेबनाव पाहता भाजप-शिवसेना हे आपले विरोधक आहेत’, असा निर्वाळाही पटेल यांनी या वेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरोधी वातावरण पाहता आगामी काळात सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील, असा विश्वासही  त्यांनी व्यक्त केला. यासोबतच काँग्रेससोबत आघाडी करण्याचेही संकेत दिले. 
 
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनदिवसीय चिंतन शिबिरात प्रफुल्ल पटेल म्हणाले, शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी होणार नाही.भाजप आणि राष्ट्रवादीमधील छुप्या समझोत्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावरही त्यांनी खुलासा केला. ‘सध्याच्या सत्ताधारी पक्षांमधले बेबनाव पाहता भाजप-शिवसेना हे आपले विरोधक आहेत’, असा निर्वाळाही पटेल यांनी या वेळी दिला. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरोधी वातावरण पाहता आगामी काळात सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील, असा विश्वासही  त्यांनी व्यक्त केला. यासोबतच काँग्रेससोबत आघाडी करण्याचेही संकेत दिले. 
 
काँग्रेससोबत खुल्या मनाने काम करू  
२०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले असते तर दोन्ही पक्षांच्या मिळून १३० ते १४० जागा निवडून आल्या असत्या, असा दावा करतानाच पटेल यांनी काँग्रेससोबत सहकार्याचे संकेत या वेळी दिले. काँग्रेस आपला शत्रू नाही, पण दोन्ही पक्षांत ‘कभी खुशी कभी गम’ असे संबंध आहेत. मात्र, भविष्यात आपल्याला खुल्या मनाने काम करावे लागेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, भाजप सरकारसाठी राष्ट्रवादीचा अदृश्य हात नाही, ते आम्ही कृतीतून दाखवू..... वाचा कोण म्हणाले असे....
बातम्या आणखी आहेत...