आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Will Bring Dawood To India With Help Of America Says Sushilkumar Shinde

अमेरिकेच्‍या मदतीने दाऊदच्‍या मुसक्‍या आवळणार- गृहमंत्री शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारताचा मोस्‍ट वॉंटेड गुन्‍हेगार अंडरवर्ल्ड डॉन व 1993 मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमच्‍या मुसक्‍या आवळण्‍यासाठी अमेरिकेची मदत घेणार असल्‍याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

दाऊद इब्राहिम पाकिस्‍तानातच असून काही दिवसांपूर्वी त्‍याचे कराचीतील वास्‍तव्‍य उघड झाले होते. त्‍याला पकडण्‍याबाबत सुशीलकुमार शिंदे म्हणाले, की त्याला पकडण्यासाठी अमेरिका आणि एफबीआयसोबत बोलणे झाले आहे. तसेच, अमेरिकेचे ऍटर्नी जनरल यांच्यासोबतही माझी चर्चा झाली असून, त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्‍यामुळे दोन्ही देशांचे एकमेकांना सहकार्य आवश्यक आहे.