आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशींच्या शोधासाठी आय शाखेचे मनुष्यबळ वाढवणार- आर. आर. पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील घुसखोर बांगलादेशी नागरिकांना शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे शाखेतील आय विभागातील मनुष्यबळ वाढवण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान परिषदेत गुरुवारी केली.

आशिष शेलार आणि इतर सदस्यांनी मुंबईतील बांगलादेशी नागरिकांकडे आधार आणि पॅन कार्ड असल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईत बांगलादेशींची संख्या वाढत आहे. या वर्षी फेब्रुवारीपर्यंतच 2234 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून 147 जणांना पुन्हा बांग्लादेशात पाठवण्यात आले आहे. घुसखोरांना शोधून काढण्यासाठी आय शाखेचे मनुष्यबळ वाढवले जाईल असेही गृहमंत्री म्हणाले. विनोद तावडे, मुझफ्फर हुसैन, विनायक राऊत, संजय दत्त, किरण पावसकर आणि दिवाकर रावते यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

महामार्गावरही ड्रंक अँड ड्रिव्हन मोहीम- मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व महामार्गांवर ड्रंक अँड ड्रिव्हन मोहीम राबवणार असून खासगी ट्रॅव्हल्स बसचे अपघात रोखण्यासाठी चालकाने दारू प्यालेली आहे की नाही याची तपासणी सुरुवातीलाच करून नंतर त्याला बस चालवण्यास परवानगी दिली जाईल, अशी माहिती गृहमंत्री पाटील यांनी दिली.