आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weapons Buying For The Police ; Cctv Camera Process Completes : R R Patil

पोलिसांसाठी शस्त्रास्त्रांची खरेदी ; सीसीटीव्ही कमे-यांकरिता प्रक्रिया पूर्ण : आर आर पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोलिसांसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी ‘स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन’ या केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच मुंबईत सीसीटीव्ही बसवण्याची फेरनिविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सादर केलेल्या प्रश्नोत्तर पुस्तिकेत दिली. मुंबईत सहा हजार सीसीटीव्ही बसवणे आणि पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देण्याबाबत कुर्ल्याचे आमदार मिलिंद कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


लेखी उत्तरात गृहमंत्री पाटील यांनी म्हटले आहे की, मुंबईत सीसीटीव्ही कॅमे-यांबाबत फेरनिविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यशस्वी निविदाकाराबरोबर करारनामा करून कार्यादेश देण्याची कार्यवाही सुरू आहे. बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीसाठी निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे पाटील म्हणाले.


देशांतर्गत तयार होणा-या शस्त्रास्त्रांची मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाला केली जाते. त्यांच्या निर्देशावरून ऑर्डिनन्स फॅक्टरीमार्फत शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जातो. परदेशातून अत्याधुनिक शस्त्रांची खरेदी स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन या केंद्र सरकारच्या उपक्रमामार्फत करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी उत्तरात म्हटले आहे. कांबळे यांनी सीसीटीव्ही, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि बुलेट प्रूफ जॅकेट घेण्याबाबत सरकारने काय कार्यवाही केली आहे, असा प्रश्न विचारला होता.