आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weather Correct Report Get Through SMS To Farmers

शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार एसएमएसने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारे व बाजारभावाची माहिती देणारे एसएमएस पोर्टल सुरू होणार आहे. शेतीतील नवे तंत्र, समस्या याबाबतही शेतक-यांना मोफत संदेशाद्वारे माहिती पुरवली जाणार आहे. येत्या मंगळवारी 16 जुलै रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या नव्या तंत्राला प्रारंभ होणार आहे.


कृषी मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले, या नव्या एसएमएस पोर्टलद्वारे देशातील 12 कोटी शेतक-यांशी संवाद साधण्यात येणार आहे. शेतीशी निगडित अडचणी, नव्या तंत्राची माहिती व इतर आवश्यक सेवा याद्वारे शेतक-यांना मिळणार आहे. सहज संवाद साधण्याचे एसएमएस हे एक उत्तम साधन आहे, याद्वारे शेतक-यांना पिकाचे उत्पादन, कृषी माल विक्री, पशुपालन, दुग्धउत्पादन व मत्स्यपालनासह शेतीसंबंधी महत्त्वाची माहिती पाठवण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना एकदा पोर्टलवर आपला मोबाइल क्रमांक नोंदवावा लागणार आहे. त्यानंतर वेळोवेळी त्यांना एसएमएस पाठवण्यात येतील. तसेच शेतक-यांना आपल्या समस्या कळवल्यास त्याबाबत एसएमएसद्वारे माहिती पाठवण्यात येईल.


या पोर्टलबाबत अधिका-याने सांगितले, या पोर्टलद्वारे मिळणा-या सेवेचा वापर शेतक-यांना नवे काही करण्याची संधी मिळणार आहे. यात माती परीक्षण त्याचे निष्कर्ष, जमिनीची खतविषयक क्षमता, खतांची निवड, खताचे प्रमाण याबाबत माहितीचा यात समावेश आहे. एसएमएसच्या माध्यमातून कृषी उत्पादनाचे बाजारभाव शेतक-यांना कळणार आहेत. त्यामुळे शेतीमालाची विक्री योग्य बाजारपेठेत करून शेतक-यांना नफा मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच आपले उत्पादन कोठे, कसे व कधी विकायचे याचा निर्णय घेणे शेतक-यांना सुलभ होणार आहे.


एवढेच नव्हे, तर विविध विभागातील तज्ज्ञ, हवामान अंदाज आणि कृषी क्षेत्रातील संशोधक स्थानिक भाषेत शेतक-यांना एसएमएसच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.


अशी होणार मोबाइल नोंदणी
येत्या 16 जुलैपासून हे पोर्टल सुरू होणार आहे. यावर नोंदणी करण्यासाठी शेतक-यांना 1800-180-1551 या टोल फ्री क्रमांकावर आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी करायची आहे किंवा संकेतस्थळावर जाऊन आपला मोबाइल क्रमांक तेथे नोंदवावा लागणार आहे. त्यानंतर मोफत एसएमएस सेवा सुरू होईल.


काय सेवा मिळणार
पीक उत्पादन, कृषी माल विक्री, पशुपालन, दुग्ध उत्पादन व मत्स्यपालन, माती परीक्षण, त्याचे निष्कर्ष, जमिनीची खतविषयक क्षमता, खतांची निवड व प्रमाण याबाबत माहिती मिळेल.


नफा मिळवण्याची शेतक-यांना संधी
एसएमएसच्या माध्यमातून कृषी उत्पादनाचे बाजारभाव शेतक-यांना कळणार आहेत. त्यामुळे शेतीमालाची विक्री योग्य बाजारपेठेत करून शेतक-यांना नफा मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच आपले उत्पादन कोठे, कसे व कधी विकायचे याचा निर्णय घेणे शेतक-यांना सुलभ होणार आहे.