आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Sutra Of Aarti Kochhar Daughter Of ICICI CEO

अमेरिकेत प्रेम, मायदेशात सप्तपदी, CEO चंदा कोचर यांची कन्या बनणार नववधु!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या समवेत कन्या आरती कोचर)

मुंबई- आयसीआयसीआय बॅंकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ चंदा कोचर यांची कन्या आरती ही लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. आरतीचा विवाह 27 नोव्हेंबरला मुंबईतील हॉटेल ताजमध्ये होत आहे. आरतीचा विवाह आदित्य काजी याच्यासोबत होत असून दोघे रिलायन्स कंपनीत कार्यरत आहेत.
आदित्यचे वडील समीर काजी आणि आई राधिका यांना अंबानी कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जाते. उल्लेखनिय म्हणजे चंदा कोचर आणि आदित्यची आई राधिका या दोन्ही बालमैत्रिणी आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी आरती आणि आदित्यचा साखरपुडा झाला होता.

अमेरिकात गुंतले एकमेकांत...
आरती आणि आदित्य यांचे कुटुंब‍िय परिचित आहेत. आदित्य आणि आरती हे दोघे देखील एकमेकांना आधीपासून ओळखत होते. मात्र, अमेरिकेत दोघे एमकेमांत गुंतले. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पेंसिलवानियामध्ये दोघांचे शिक्षण झाले. या काळातच दोघांमध्ये प्रेम फुलले.

मायदेशात परतल्यानंतर एकाच कंपनीत नोकरी...
अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर आरती आणि आदित्यने मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे दोघांनी सुरुवातीला BCG अॅण्‍ड Booz & Co मध्ये सोबतच नोकरी केली. नंतर दोघांनी रिलायन्स कंपनी ज्वाइन केली. फॅशनची आवड असणार्‍या आरतीने 'रिलायन्स ब्रांड्स' विभागात जाणे पसंत केले तर आदित्यने 'जिओ इन्फोकॉम' विभागात कार्यरत आहे.

हॉटेल 'ताज लॅंड END'मध्ये शाही पार्टी...

आरती आणि आदित्यच्या विवाहाची शाही पार्टी मुंबईतील हॉटेल 'ताज लॅंड END'मध्ये आयोजित करण्यात आली आहे. 29 नोव्हेंबरला ही पार्टी होणार आहे. यापूर्वी विवाहाचे सर्व विधी चंदा कोचर यांच्या राहाण्या घरी होणार आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, नववधु आरती कोचर यांचे निवडक फोटो...