आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - वीकेंडला म्हणजेच आठवडी सुट्या आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी पर्यटन स्थळांवर मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा विचार आहे.
मुंबई महापालिकेने पार्किंगचे नव्याने धोरण आखण्यासाठी मागवलेल्या सूचनांमध्ये गटनेत्यांकडून या प्रस्तावाची शिफारस आली आहे. या नवीन धोरणांवर सदस्य पुढील आठवड्यामध्ये चर्चा करणार आहेत. दरम्यान, याआधीच शहरातील गर्दीच्या ठिकाणांवरील पार्किंगच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक सुटी आणि वीकेंडला नागरिक कोणत्या पर्यटनस्थळावर जाण्यास प्राधान्य देतात, याची माहिती घेण्यास सुरुवात केल्याचे, अतिरिक्त महापालिका आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले.
गेट वे ऑफ इंडिया आणि गिरगाव चौपाटी सारख्या ठिकाणी ही सुविधा देण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. तसेच इतर ठिकाणांबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर महापालिका पार्किंग मार्शल्सचे पथक तयार करण्याबाबतही विचार करत आहे. नवीन धोरणाची योग्य पद्धतीने अंंमलबजावणी व्हावी यासाठी हे पथक काम करणार आहे. पार्किंगमध्ये वाहनधारकांनी पैसे द्यावे, यासाठी ते प्रामुख्याने काम करतील. मात्र, या पथकामध्ये किती सदस्य असतील याबाबत अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्या फक्त मार्शल्सची भर्ती केल्या जात असून, एकदा सर्वसाधारण सभेने मान्यता दिली की, त्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे श्रीनिवासन म्हणाले.
सध्या महापालिकेकडे 88 पे अँड पार्कची ठिकाणे आहेत. त्यापैकी सुमारे 50 हून अधिक स्थळांवर वाहनधारक पार्किंगचे पैसेच अदा करत नसल्याच्या तक्रारी असल्याचे एका अधिकार्याने सांगितले आहे. त्यामुळेच मार्शल्सची नियुक्ती केली जात असून. जे वाहनधारक पार्किंगचे पैसे अदा करणार नाहीत, अशांवर कारवाई करण्याचा अधिकार त्यांना असेल, असेही त्या अधिकार्याने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.