• Home
  • Maharashtra
  • Mumbai
  • Well known builder commits suicide in Thane, Suraj Parmar, President of top builders association 'MCHI' shot himself with his revolver

ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर / ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांची गोळ्या झाडून आत्महत्या

दिव्यमराठी वेब टीम

Oct 08,2015 09:34:00 AM IST
मुंबई- ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार (वय 46) यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास आपल्या मानेत गोळ्या झाडून आत्महत्या केली. सूरज परमान हे महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीच्या (MCHI-Credai) ठाणे विभागाचे अध्यक्ष होते. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सूरज परमार हे आज दुपारी आपल्या सुरु असलेल्या साईटवर गेले होते. कासारवडवली येथे परमार यांची कॉसमॉस हेवन नावाच्या अपार्टमेंट सोसायटीचे काम सुरु आहे. तेथेच दुपारी ते थांबले होते. दुपारी पावनेदोन ते दोनच्या दरम्यान त्यांनी सॅंपल फ्लॅटमध्ये पिस्तूलाच्या दोन गोळ्या उजव्या मानेत झाडल्या. यात ते जागीच गतप्राण झाले. काही वेळाने साईटवरील कर्मचा-यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
X
COMMENT