आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसनगाव-वाशिंद दरम्यान रुळालगतची माती खचली; कसाऱ्यापर्यंतची लोकलसेवा ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुळालगतची माती खचल्याने आसनगाव-वाशिंद दरम्यानची लोकलसेवा आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
रुळालगतची माती खचल्याने आसनगाव-वाशिंद दरम्यानची लोकलसेवा आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. (संग्रहित फोटो)
मुंबई- रुळालगतची माती खचल्याने आसनगाव-वाशिंद दरम्यानची लोकलसेवा आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्याने प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
 
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आसनगाव ते कसाऱ्यापर्यंतच्या परिसरात प्रचंड दाणादाण उडाली होती. आज सकाळी आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानका दरम्यान रेल्वे रूळाखालील माती घसरल्याने या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. दरम्यान, ही रेल्वे सेवा कधी सुरू होईल याबाबत रेल्वेने काहीच स्पष्ट न केल्यानेही प्रवाशी वैतागले.
 
गेल्या आठवड्यात आसनगाव ते वाशिंद स्थानकादरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरून अपघात झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक चार दिवस बंद ठेवण्यात आली होती. ही वाहतूक सुरू व्हावी म्हणून प्रवाशांना आंदोलन करावे लागले होते. त्यानंतर आज पुन्हा रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...