आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरांचा कारभार चालवणे हे सरकारचे काम नाही : मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गेल्या ५० वर्षांत केलेल्या गैरव्यवहाराचा मुद्दा बुधवारी विधानसभेत चांगलाच गाजला. या देवस्थान समितीच्या विश्वस्तांच्या ऐवजी राज्य सरकारने स्वतः अधिकारी नेमून मंदिराचे कामकाज पाहावे, अशी सूचना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काही सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ही मागणी फेटाळून लावली.

मंदिरांचा कारभार चालवणे हे राज्य सरकारचे काम नाही. सार्वजनिक विश्वस्त संस्थेनेच मंदिरांचे हे काम पाहावे, मात्र काही विशेष प्रकरणांत राज्य सरकार हस्तक्षेप करील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.