आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नोटांनी बुक तिकीट रद्द होणार नाही, केंद्राच्या एअरलाइन्सला सूचना; रेल्वेनी बंदी उठवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पश्चिम रेल्वेने गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस एसी फर्स्ट आणि सेकंड क्लास वेटिंग तिकीट जारी न करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे 13 नोव्हेंबर आणि त्यानंतर प्रवास करु इच्छिणाऱ्या प्रवाशांना होणारी अडचण टळली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्यानंतर ब्लॅकमनी तिकीट खरेदीच्या रुपाने व्हाइट करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात आले होते.
जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधानांनी रेल्वेस्टेशन आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी 11 नोव्हेंबरपर्यंत 500-1000 रुपयांच्या नोटा चालणार असल्याचे सांगितले होते.
तिकीट बुकिंगमध्ये 25% वाढ
- एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, पश्चिम रेल्वेने गुरुवार आणि शुक्रवारी (10-11 नोव्हेंबर) वेटिंग तिकीट बुकिंग बंद केले आहे.
- दोन दिवसांमध्ये तिकीट बुकिंगमध्ये 25 टक्के वाढ झाली. त्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
- रेल्वे बोर्ड सदस्य मोहम्मद जमशेद यांनी सांगितले की सरकारचे प्रत्येक प्रकारच्या तिकीट बुकिंगवर लक्ष आहे.
- अशी माहिती आहे की रेल्वे तिकीट बुक करण्याच्या नावाखाली लोक 1000-500 रुपयांच्या नोटा चालवत आहेत. वेटिंग तिकीट खरेदी करुन नंतर ते रद्द केले जाईल व आपल्या बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी स्ट्रॅटिजी वापरली जात होती.
- रेल्वेने अशा पद्धतीने 500-1000 रुपयांच्या नोटा चालवणे आणि पैसे वसूल करण्याच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
- अशीही माहिती आहे की रोख रकमेच्या कमतरतेमुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

असे समजून घ्या तिकीट गौडबंगाल
- जर तुम्ही रेल्वेचे वेटिंग तिकीट (ऑनलाइन किंवा काऊंटर) घेतले असेल आणि ते कन्फर्म झाले नाही तर आपोआप ते रद्द होते.
- एसी फर्स्ट क्लासमध्ये एका व्यक्तीचा किराया 4500 आणि सेकंड क्लासमध्ये 2600 रुपये आहे.
- असे जर असेल तर 10 जणांनी वेटिंग तिकीट बुक केल्यानंतर त्यांची एकत्रित किंमत 45 हजार होते.
- ऑनलाइन तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते आपोआप रद्द होते, आणि पैसे परत मिळतात. अशा पद्धतीने हे पैसे व्हाइट होऊन जातात.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...