आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Western Railway Traffic Halted Due To Heavy Rain

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्‍वेला रेड सिग्‍नल, वसईपुढे वाहतूक ठप्‍प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजरातमध्‍ये झालेल्‍या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्‍वेला मोठा फटका बसला आहे. वसई रोड ते वलसाड रेल्‍वे स्‍थानकांदरम्‍यान रेल्‍वे रुळांवर पाणी असल्‍यामुळे पश्चिम रेल्‍वेने अनेक गाड्या रद्द केल्‍या आहेत. तसेच उपनगरीय रेल्‍वे गाड्या केवळ वसई रोडपर्यंतच धावणार आहेत. आटुल आणि पारडी रेल्‍वे स्‍थानकांदरम्‍यान पुलांवरुन पाणी वाहत आहे. त्‍यामुळे पाणी ओसरेपर्यंत अहमदाबाद येथून मुंबईकडे येणा-या काही गाड्या सुरतपासूनच मागे वळण्‍यात आल्‍या आहेत. तर दिल्‍लीकडून येणा-या लांब पल्‍ल्‍याच्‍या गाड्या विविध स्‍थानकांवर थांबविण्‍यात आल्‍या आहेत. वलसाड ते सुरत स्‍थानकांदरम्‍यानही वाहतूक थांबविण्‍यात आली आहे.

पश्चिम रेल्‍वेच्‍या जनसंपर्क अधिका-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अहमदाबाद-मुंबई कर्नावती एक्‍स्‍प्रेस, अमदाबाद-मुंबई डबलडेकर एक्‍स्‍प्रेस या गाड्या सुरत येथेच टर्मिनेट करण्‍यात आल्‍या. तसेच मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्‍स्‍प्रेस उद्वदा येथे टर्मिनेट करण्‍यात आली. मुंबई सेंट्रल-अहमदाबाद गुजरात एक्‍स्‍प्रेस वापी येथे टर्मिनेट करण्‍यात आली. अहमदाबाद-मुंबई सेंट्रल गुजरात एक्‍स्‍प्रेस सुरत येथूनच मागे वळविण्‍यात आली.

आज सकाळी वलसाड रेल्‍वे स्‍थानकावर पाणी साचले होते. त्‍यामुळे मुंबईकडे येणा-या राजधानी एक्‍स्‍प्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्‍स्‍प्रेस, गोल्‍डन टेम्‍पल मेल, अवंतिका एक्‍स्‍प्रेस, इत्‍यादी गाड्या सुमारे 5 तास थांबविण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यानंतर त्‍या हळूहळू मुंबईकडे रवाना करण्‍यात आल्‍या. त्‍यापैकी राजधानी आणि दुरांतो एक्‍स्‍प्रेस पुन्‍हा उद्वदा येथे थांबविण्‍यात आल्‍या होत्‍या.