आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जुहू किनाऱ्यावर आढळला 30-35 फुटांचा मृत मासा, वजन तब्‍बल 20 टन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर ब्रुडीज व्हेल जातीचा मासा मृतावस्थेत आढळला. हा मासा सुमारे 30 ते 35 फूट लांबीचा असून त्याचे वजन तब्बल 20 टन आहे. समुद्राला भरती असल्याने किनाऱ्यावर येत असलेला हा मासा वाळूत रुतून बसला. या माशाला क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात येणार आहे. या माशाच्‍या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्‍या आहेत. त्‍याचा मृत्‍यू कसा झाला याचा तपास घेण्‍यात येत आहे.
या आधी सात ते दहा फूट लांबीचे अनेक मासे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या लांबीचा आणि वजनाचा मासा प्रथमच किनाऱ्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

- माशाची लांबी 30 ते 35 फूट.
- तब्‍बल 20 टन आहे ब्रुडीज व्हेलचे वजन.
- समुद्राला भरती असल्याने हा मासा किनाऱ्यावर आला.
- माशाला क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात येणार आहे.
एवढा मोठा मासा प्रथमच
- वनखात्याकडून रात्रभर या ठिकाणची पाहणी करण्‍यात आली.
- आधी सात ते दहा फूट लांब मासे समुद्र किना-यावर आढळले.
- एवढा मोठा मासा प्रथमच किना-यावर आढळून आला आहे.
- माशाला पाहण्‍यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, ब्रुडीज व्हेल माशाचे फोटो....