आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलिबाग: अबब.. दोन हजार किलो अन् 42 फुटी अजस्त्र व्हेल मासा सापडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलिबाग- दोन दिवसापूर्वी अलिबागच्या समुद्रकिना-यावर दोन हजार किलो वजनाचा व 42 फुट लांबीचा व्हेल जातीचा मासा आढळून आला होता. या माशाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अलिबागमधील रेवदंडा येथे समुद्रकिनारी बुधवारी हा मासा सर्वप्रथम दिसला होता. त्यानंतर या माशाला पाहण्यासाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. यानंतर जिल्हा प्रशासन व स्थानिकांनी या व्हेल जातीच्या माशाला समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी उशिरा या माशाला खोल समुद्रात सोडण्यात आले. मात्र, हा मासा आज भल्या पहाटे पुन्हा समुद्रकिनारी आल्याचे दिसून आले. मात्र, त्यावेळी हा मासा मृत अवस्थेत आढळून आला.
प्रशासनाला याची मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी या व्हेल माशाला मृत घोषित केले. हा मासा मागील काही दिवसापासून आजारी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला नेहमीच्या गतीने समुद्रात पोहता येत नसल्यानेच तो समुद्रकिनारी पोहचला असावा व त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज जिल्हा वैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या अजस्त्र व्हेल माशाचा मृत झाल्यानंतर स्थानिकांनी त्याला पाहण्यासाठी पुन्हा एकदा गर्दी केली होती. तसेच या माशाची परिसरात दुर्गंधी येऊ नये व त्यातून काही आजार पसरू नये म्हणून प्रशासनाने या व्हेल माशाला खड्ड्यात पुरुन विल्हेवाट लावणार आहे.
पुढे पाहा, या अजस्त्र व्हेल माशाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...