आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाही.. नाही.. म्हणणारे देवेंद्र आता NCPवर बोलायला तयार नाही, नेत्यांनी अशा मारल्या कोलांटउड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या गल्लीतील नेत्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. मोदींचा रोख विशेषतः राष्ट्रवादीवर होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, त्यांची कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. हे नेते समोरासमोर आले तर, मुद्यावरुन गुद्यावर आल्याशिवाय राहाणार नाही, असे सर्वसामान्य मतदारांना तेव्हा वाटत होते. मात्र, 15 ऑक्टोबरला मतदान झाले आणि प्रचाराचा धुराळा खाली बसला. 19 ऑक्टोबरला मतमोजणी संपलेली नसतानाही, दुपारीच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यावर 'चाचा-भतिजा'चा पाठिंबा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका एकाही भाजप नेत्याने घेतली नाही.
बुधवारी (12 नोव्हेंबर) विधानसभेत भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र तो कोणाच्या जीवावर, त्यांना कोणी पाठिंबा दिला हे त्यांना मतदान करणार्‍या जनतेला पडलेले प्रश्न आहेत. त्याचे उत्तर भाजपला द्यावे लागणार आहे. कारण निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांनी (भाजप आणि राष्ट्रवादी) आपल्या मित्रपक्षासोबतची युती आणि आघाडी तोडली आणि एकमेकांवर शरसंधान सुरु केले. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला 'नॅचरल करप्ट पार्टी' म्हटले तर, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला 'चड्डीवाल्यांचा पक्ष' म्हणून हिणवले. यांच्या हातात सत्ता देणार का, असा सवाल केला. एकमेकांचे एवढे वाभाडे काढल्यानंतर हे दोन टोकांचे पक्ष एकमेकांना साथ कशी देऊ शकतात हा जनतेच्या आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे. यावर येणार्‍या काळात जनताच निर्णय घेईल, तुर्तास आपण या दोन्ही पक्षांसह महाराष्ट्रातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीआधी एकमेकांना काय म्हटले आणि निवडणुकीनंतर त्यांचा सुर कसा बदलाला याचा आढावा घेऊ.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, निवडणूकीआधी राष्ट्रवादीबद्दल काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस

(छायाचित्र - सोशल नेटवर्किंग साइटवरुन)