आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएमआरडीएच्या श्वेतपत्रिकेचे काय झाले : राष्‍ट्रवादी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - एमएमआरडीएच्या प्रकल्पात झालेल्या अपघातात तीन मजुरांचा बळी गेला. गेल्यावेळीही एमएमआरडीएच्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पामध्ये अशाच प्रकारे काही कामगारांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी एमएमआरडीएच्या श्वेतपत्रिकेची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी ती मान्यही केली होती. मात्र, अद्यापही ही श्वेतपत्रिका निघालेली नाही. स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री आता तरी आपल्या शब्दाला जागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी लगावला. तसेच या प्रकल्पाचे काम दुसरी कंपनी पाहत असली तरी एमएमआरडीए प्रमुख जबाबदार संस्था असल्याने त्यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंदवायला हवा, अशी मागणीही मलिक यांनी केली.

एमएमआरडीएने झटकले हात
बुधवारी रात्री झालेल्या अपघातात तीन ठार तर सहा जण जखमी झाले होते. मात्र, हा प्रकल्पाचा जो भाग कोसळला त्याचे बांधकाम मुंबई इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी करत असून त्यामध्ये एमएमआरडीएचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण एमएमआरडीएतर्फे देण्यात आले आहे.