आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Action Taken Agaist Making Poem Lady Police Inspector?:high Court

कविता लिहिणा-या महिला पोलिस निरीक्षकाविरोधात काय ? : उच्‍च न्यायालय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आझाद मैदान दंगलीवर कथित आक्षेपार्ह कविता लिहिणा-या महिला पोलिस निरीक्षकाविरोधात केलेल्या कारवाईची दोन आठवड्यांत माहिती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिस प्रशासनाला दिले.
पोलिस निरीक्षक सुजाता पाटील यांनी लिहिलेली कविता पोलिसांच्या ‘संवाद’ मासिकात प्रसिद्ध झाली होती. त्याला आक्षेप घेणारी याचिका अमीन इद्रिसी व मोहंमद सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

न्यायमूर्ती अजय खानविलकर व न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ही कविता प्रक्षोभक व तेढ निर्माण करणारी असून ती लिहिणा-या सह पोलिस आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या याचिकेत केली आहे. यासंदर्भात मासिकामध्ये पाटील यांनी लेखी माफी मागितल्याची माहिती सरकारी वकिलांच्या वतीने देण्यात आली. पण, त्यांच्याविरोधात काय कारवाई केली याची माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.