आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Are The Steps Takes For Drought ? High Court Question

दुष्काळी परिस्थितीत काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - सांगली जिल्ह्यातील आटपाडी व आजूबाजूच्या दुष्काळग्रस्त भागात परिस्थिती सुधारण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल शुक्रवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. या परिसरात राहणा-या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चा-यासाठी दिवसागणिक सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च होणे ही गंभीर बाब असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

सांगली जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून अवर्षणाची परिस्थिती आहे. येथील पाझर तलाव व अन्य जलाशयांमधील पाणीसाठ्याची अवस्था अतिशय चिंताजनक आहे. बहुतांश तलाव कोरडे पडले आहेत. कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेचे काम तिस-या टप्प्यात असून केंद्र सरकारच्या निधीअभावी ते बंद अवस्थेत आहे. हा निधी लवकरात लवकर मिळावा व येथील ग्रामस्थांची परिस्थिती सुसह्य व्हावी, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. या परिसरात पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणारी याचिका माजी आमदार अनिल बाबर यांनी दाखल केली आहे.


‘पाटबंधारे’चा 110 कोटींचा प्रस्ताव : दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यातील टेंभू उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी 110 कोटी रुपये द्यावेत, असा प्रस्ताव मागील महिन्यात पाटबंधारे महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केला आहे, अशी माहिती याचिकेत देण्यात आली. त्यावर राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.