आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री असताना पवारांनी काय केले : उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शरद पवार ३५ वर्षांनंतर शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यात मोर्चा काढणार आहेत, परंतु हे त्यांच्या नाकर्तेपणाचेच पाप आहे. सिंचनाचे प्रकल्प अपूर्ण ठेवून त्याचे पैसे जिरवले. शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, अशी मागणी घेऊन आम्ही फिरत होतो, तेव्हा कृषिमंत्री असलेल्या शरद पवारांनी काय केले?’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुुरुवारी उपस्थित केला. "मार्मिक'च्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था रिकाम्या डबड्यासारखी आहे. त्यांच्याकडे काही नसल्याने केवळ टीका करण्याचा खडखडाटपणा करत आहेत. राजकारणात कोण कोणाच्या अंगात येतो ते कळत नाही, नुसतीच चर्चा सुरू असते. याकूबला फाशी दिली तरीही चर्चा, देशात पाकिस्तानी अतिरेकी घुसत अाहेत, तरीही उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू अाहे,’ अशी टीकाही ठाकरेंनी केली. मार्मिक, सामना आणि शिवसेना हे त्रिशूळ जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठी माणूस आणि हिंदू यांना देशात कोणताही धोका नसल्याचेही ते म्हणाले.