मुंबई - येत्या 26 जानेवारीला संबंध देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जाईल. दरम्यान, अनेक जण कागदी किंवा कापडी राष्ट्रध्वज खरेदी करतील. त्या अनुषंगाने या तिरंग्याविषयी असलेल्या काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक भारतीय म्हणून त्यांची माहिती तुम्हाला असणे अत्यंत गरजेचे आहे.
शहिदाच्या मृतदेहवर असलेल्या राष्ट्रध्वजाचे काय होते ?
राष्ट्र निर्मितीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी ज्यांना अतुलनीय कार्य केले किंवा जे देशासाठी सीमेवर लढताना शहीद झाले, अशा व्यक्तींच्या मृतदेहावर राष्ट्रध्वज ठेवला जातो. पण, ज्या वेळी प्रत्यक्ष अंत्यसंस्काराची वेळ येते त्यावेळी मृतदेहाववरून सन्मानाने राष्ट्रध्वज काढला जातो. नंतरच मृतदेह कब्रीमध्ये किंवा सरणावर ठेवला जातो. दरम्यान, ध्वजाची केसरी पट्टी मृतदेहाच्या डोक्याच्या बाजूने असणे आवश्यक आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नेमके काय केले जाते त्या राष्ट्रध्वजाचे......