आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवेड्या मुलांच्या पालकांची चिंता वाढवणारा ‘डार्क नेट’, काय आहेत त्याचे धोके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘ब्ल्यू व्हेल’नंतर आता ‘डार्क नेट’ हा तितकाच धोकादायक खेळ माहितीच्या महाजालात दाखल झाला आहे. इंटरनेटवेड्या मुलांच्या पालकांची चिंता वाढवणाऱ्या या खेळाचा गोवंडीतील एक दहावीतील मुलगा पहिली शिकार ठरला असल्याची शक्यता आहे. या खेळाचा तिसरा टप्पा पार करताना त्यातील आव्हानानुसार या मुलाने आपले घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

काय आहे डार्क नेट?
सायबर क्राईमच्या भाषेत इंटरनेटच्या त्या भागास डार्कनेट म्हटले जाते. ज्या भागात पोहचणे अशक्य असते. टॉर, डिपनेट सारखे ब्राऊजर ओनियन राऊटरचा उपयोग करतात. कांद्याच्या पातळ पापुद्र्यासारखा याचा वापर करण्यात येतो. सामान्य ब्राऊजर संकेतस्थळाशी थेट जोडलेले असते. तर ओनियन राऊटर एकापाठोपाठ एक सर्वरशी जोडलेले असते. त्यामुळे लेयर वाढत जातो आणि हे कळत नाही की गुन्हा कुठून झाला आहे. गुन्हा झाल्यावर पोलिसांनी प्रॉक्सी किंवा आयपी अॅड्रेसही कळत नाही. पहिला याचा वापर केवळ गुप्तचर यंत्रणाच करत होत्या.
 
पुढील स्लाईडवर आणखी माहिती
बातम्या आणखी आहेत...