आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Possible, Shiv Sena Do That Uddhav Thackeray

जे होऊ शकते, त्याचेच शिवसेना वचन देते - उद्धव ठाकरे यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष वारेमाप आश्वासने देत असतात. मात्र, शिवसेना जे शक्य आहे, त्याचाच शब्द देते आणि तो पूर्णही करते, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांना देण्यात येणा-यादेशातल्या पहिल्या कॅशलेस वैद्यकीय विमा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेमुळे पालिका कर्मचाऱ्यांना देशातील चार हजार रुग्णालयामध्ये उपचार घेता येणार आहेत. उद्धव म्हणाले, बृहन्मुंबई पालिकेचा प्रत्येक कर्मचारी अगणित समस्यांना तोंड देत शहरवासीयांची सेवा करत असताे. म्हणूनच मुंबापुरीच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्यांचा आज सन्मान करताना अभिमान वाटतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी सेना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दुष्काळग्रस्तांना निधीम्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी १ लक्ष ५१ हजार रुपयांचा धनादेश या वेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.